सही व तुमचा स्वभाव

सही व तुमचा स्वभाव

सही प्रत्येकाची एक लकब असते , असे काही खास असते जे आपण आपल्या स्वाक्षरी तुन जगापुढे मांडतो…
कलाकार लोकांची स्वाक्षरी तर एक दम फर्राटेदार असते…
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख विविध माध्यमांतून करता येऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव, त्याच्यावरील झालेले संस्कार, परिस्थिती तसेच वातावरणानुसार ठरत असतो असे मानले जाते. व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना अनेक बाबींचे अध्ययन केले जाते. सही अर्थात सेलीब्रिटींचा ऑटोग्राफ यावरूनही त्यांच्या स्वभावाची ओळख करता येऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या सहीवरून ओळखणे सहज शक्य आहे.
१) जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते. असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात.
२) जी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात.
३) काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात. त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. असे लोक सहसा धुर्त असतात. हे लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणासमोर बोलत नाहीत. कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन कुणाचंही नुकसान करु शकतात.
४) जे लोक कलात्मक आणि आकर्षक सही करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुदा कलाकार असतात.
५) काही लोक सहीच्या खाली दोन रेषा ओढतात. अशी सही करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते. असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात.खर्च करण्यामध्ये या लोकांचा हात आकडता असतो. अर्थात या लोकांना आपण कंजूस म्हणू शकतो.
६) जे लोक सहीतील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहीतात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो.
७) ज्या व्यक्तींच्या सहीमध्ये लयबद्धता आढळत नाही त्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात.
८) ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मध्येच कापल्या सारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याचे स्पष्ट होते. यांना कोणत्याही कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते.
९) काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांची स्वाक्षरी हे एक सारखेच असते अशा व्यक्ती त्यांची सगळी कामं चांगल्या प्रकारे करतात. अशा व्यक्ती संतुलित असतात. समोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात वेगळा अशा स्वरूपाचे नसतात. ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात.
१०) जी व्यक्ती स्वाक्षरीला लिहीताना खालून वर घेऊन जातातते लोक आशावादी असतात. निराशा ही त्यांच्या स्वभावातच नसते. अशा लोकांचा देवावर अधिक विश्वास असतो. या लोकांना आयुष्यात प्रगती करायची असते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती चांगलं प्रतिनिधीत्व करू शकतात.
लोकांसमोर आपली ओळख बनविणारं आपलं हस्ताक्षर किंवा सही ही आपलं स्वभाव कसा आहे हे दर्शवतं. होय आपली सही देखील आपला स्वभाव कसा आहे हे दाखवते.

तुमची सही काय सांगते.

ज्या लोकांची सही ही सरळ आणि स्पष्ट असते ती लोकं सरळ स्वभावाची असतात आणि त्या व्यक्ती विशाल हृदयाच्या असतात. असे व्यक्ती समाजात बरीच प्रतिष्ठा मिळवितात
जे लोकं सही स्पष्ट आणि गोलाकार स्वरुपात करतात असे लोक चांगले चिंतक असतात. तसेच असे लोक विचारक, लेखक, संपादक असतात यांच्यामध्ये कायम नवं काही तरी शोधण्याची वृत्ती असते. तसेच असे लोक भावनाप्रधान असतात. जीवनातील लक्ष्य प्राप्त करण्यासाठी ही लोकं काहीही करु शकतात.
जी लोकं सहीचं पहिलं अक्षर मोठं लिहतात असे लोक विलक्षण प्रतिभावंत असतात. अशी लोकं आपलं काम वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण करतात. ज्यांच्या स्वाक्षरीतील पहिलं अक्षर मोठं आणि बाकी अक्षर छोटे छोटे असतात अशा व्यक्ती हळूहळू एका खास स्थानावर पोहचतात. अशा व्यक्तींना जीवनामध्ये सर्व सुख-सुविधा मिळतात.
ज्या व्यक्ती वेगानं आणि अस्पष्ट अशी सही करतात अशा लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अशा लोकांना सुखी जीवनासाठी बरंच झगडावं लागतं. अशी लोकं प्रचंड मेहनती असतात. त्यांचा स्वभावही चतुर असतो. त्यामुळे त्यांना कोणी धोका देऊ शकत नाही.
काही लोक आपल्या सहीच्या खाली दोन लाइन ओढतात. अशा लोकांच्या मनात कायम असुरक्षेची भावना असते. असे लोक कोणत्याही कामच्या यशाबाबत साशंक असतात. खर्च करण्यात यांचा कायमच हात आखडता असतो.
जी लोकं पेन उचलता एकाच वेळी सही करतात असे लोक गूढ, लढाऊ प्रवृत्तीचे असतात.
जी लोकं सहीनंतर एक टिंब किंवा काही खास चिन्ह देतात असे लोक फारच रचनात्मक असतात. त्यांना सजावट फारच आवडते. पण असे लोक जरासे घाबरट आणि लाजाळू असतात.
ज्यांची सही मध्यम आकाराच्या अक्षराची असते अशी व्यक्ती प्रत्येक काम फारच चांगल्या पद्धतीने पार पाडते. अशा व्यक्ती कामामध्ये फारच संतुलित असतात. आपण जसे आहोत तसंच जगासमोर यांचं वर्तन असतं.
ज्यांची सही सामान्यपणे तुटक असते असे लोक नकारात्मक विचारांचे असतात. यांना कोणत्याही कार्यामध्ये पहिले अपयशच दिसतं.
जे लोकं आपली सही खालून वर करतात अशी लोकं कायम आशावादी असतात. निराशेचा भाव कधीही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. असे लोक देवावर विश्वास ठेवणारे असतात.

सही आणि स्वभाव

१. अनेकांना आपल्या सहीचे अप्रूप असते. काही जण तर सतत आपल्या सहीचा सराव करत असतात. अशा व्यक्ती आत्मकेंद्री मानल्या जातात. अशा व्यक्तींमध्ये अहंपणा अधिक असतो.आपल्या शिवाय इतर कोणीही ज्ञानी नाही अशी त्यांची धारणा असते.
२. ज्या व्यक्तींची सही छोटी असते, अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो असे समजावे. अशा व्यक्तींना स्वतः:वर विश्वास नसल्याने या व्यक्ती हात आखडता घेत आपली सही करत असतात. काही प्रसंगी आळशीपणाही त्यांच्यात दिसून येतो.
३. आपल्या नावात झाड, फुले, हसरा चेहरा काढणार्‍या व्यक्ती या दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींचा स्वभाव भयंकर मुडी असतो.
४. अनेकांना आपल्या सहीमध्ये गोलाकार काढण्याची सवय असते. अशा व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात. काही प्रसंगी त्यांच्यात अतिआत्मविश्‍वास दिसून येतो.
५. काही व्यक्ती आपल्या नावाऐवजी आडनाव अधिक गडद करण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा गर्व असतो. आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास असल्याचे दिसून येते.
६. काही व्यक्ती आपल्या सहीमध्ये मध्येच इंग्रजी किंवा मध्येच आपल्या मातृभाषेतील शब्दांचा वापर करतात. अशा व्यक्तींचे ध्येय अनिश्चित असते. त्यांना कोणतीही गोष्ट करताना प्लॅनिंग करायला आवडत नाही. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांच्या करियरवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
७. काही व्यक्ती आपल्या सहीमध्ये देवाचे नाव घुसवण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा त्यात गणपती किंवा इतर इष्ट देव काढण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींचा देवावर तसेच दैवावर अधिक विश्वास असल्याचे दिसून येते. अशा व्यक्ती नशिबावर अधिक विश्वास ठेवणार्‍या असतात.
८. काही व्यक्तींना सही करताना तुटक-तुटक सही करण्याची सवय असते, अशा व्यक्ती प्रचंड एकलकोंड्या असतात. त्यांना जगाचे काही घेणेदेणे नसते. मी आणि माझे आयुष्य यावर त्यांचा विश्वास असतो.
९. काही व्यक्तींना सहीखाली रेषा काढण्याची सवय असते. अनेक जण सहीखाली दोन रेषा तर काही जण एक रेषा ओढतात. ज्या व्यक्तींच्या सही खालील रेषा सरळ असते त्या व्यक्ती अत्यंत परखड मताच्या असतात. अशा व्यक्ती आपल्या मतावर ठाम असतात. ज्या व्यक्तींची रेषा तिरकस किंवा तुटक असते अशा व्यक्ती मुडी असतात.
१०. काही व्यक्तींना आपल्या सहीला गोल करण्याची सवय असते, अशा व्यक्ती इतरांचा विचार न करता, केवळ स्वार्थी वृत्तीने जगत असतात.

11 thoughts on “सही व तुमचा स्वभाव”

Leave a Comment